शाळा आणि सर्वसामान्य विद्यार्थांना ज्ञानदानाचे कार्य माझ्यासाठी नेहमीच आत्मियतेेचा विषय राहिला आहे.
परिस्थितीमुळे आम्हाला तितके शिक्षण घेता आले नाही परंतु येणाऱ्या माझ्या नवीन पिढीला त्याचा सामना करावा लागू नये ही माझी मनापासूनची इच्छा असते.
माझे जन्मगाव असलेल्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडी येथील शाळेच्या वर्गांचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे असे माझ्या काही महिन्यांपूर्वी निदर्शनास आले आणि त्याप्रकरनी लक्ष घालण्यासाठी माझ्या गावातील काही सहकाऱ्यांनी मला एक विनंती केली.
तात्काळ मी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील सुपरफास्ट मुख्यमंत्री मा.ना एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी मागणी केली. त्याची तात्काळ दखल घेत मा मुख्यमंत्री मोहदयांनी त्वरित 7 नवीन वर्ग खोल्या मंजूर करून दिल्या आणि तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी आदेश दिले.
यामुळे शाळेचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे एक मोठे समाधान मला आहे.
सर्वात महत्वाचे आभार आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब
0 Comments