काळ किती बदलतो ना…!
आज लग्नाला त्रेचाळीस वर्ष झाले… सहज बसून जुने फोटो पाहत होतो…विलक्षण बदल जाणवतो.
परंतू…
असे पाहिल्यावर अचानक कधी कधी जुन्या आठवणी जाग्या होतात… अलगत उचलून त्या सोनेरी दुनियेत घेऊन जातात…
1980 साल, आयुष्यात पहिल्यांदाच घातलेला कोट, गावाकडची जिवाभावाची मित्रमंडळी आणि लग्नात सामील झालेले सारे गाव… सार काही विलक्षण होत.
आज दररोज सोशल मीडियावर नवनवीन फोटो टाकतोय परंतु जुने काळे पांढरे फोटो मनात वेगळाच रंग भरून जातात, मरगळ आलेल्या मनाला टवटवीत करून जातात.
कारण ती जुनी दृश्य बुडाली तरी आठवणी बुडत नसतात, प्रत्यक्षात पेक्षा आठवणीचा सुगंध जास्त असतो.
आजच्या धकाधकीच्या दिवसापेक्ष्या जुने जगलेले दिवस चांगले वाटू लागतात…आणि असं वाटतं त्याच सुखाच्या आठवणीत रमून जावे.
.
.
शेवटी एक गोष्ट नक्की आहे काळ बदलतो तस बदलाव लागत…अगदी आता काही वर्षांपर्यंत कधी आम्ही एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या…पर्यंतू जुन्या संस्कारातून आलेली आपुलकी आणि प्रेम तसचं होत…न बोलता आणि न व्यक्त करता…अगदी या जुन्या फोटोंसारख.😊
All reactions:

You, रवि ढोबळे, Kiran Shivajirao Bodake and 560 others

Categories: इतर

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *