हे गणराया…
अग्र पुजेचा तु अधिकारी,
करी विघ्नांचा संहार रे तुला |
गेले कित्येक दशकापासून माझ्यासाठी वर्षभरातील सर्वात आत्मीयतेचा सण कुठला असेल तर तो सार्वजनिक गणेशोत्सव.
याप्रसंगी चैतन्य प्रासादिक भजनी मंडळ वरळी यांचे अतिशय सुश्राव्य असे भजन संपन्न झाले.
नवी मुंबई परिसरातील माझ्या अनेक सहकाऱ्यांनी उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले.
परिसरातील सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्त माझ्या अनेक सहकाऱ्यांची भेट झाली. सोसायटी तथा परिसरातील माझ्या माता भगिनी, अबाल वृद्धांनी आपला मनोभावे सहभाग घेऊन कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न केला.
Ashok Gawade – अशोक गावडे
0 Comments