‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’
शिववाहतूक सेना रिक्षा संघटना नवी मुंबईचे अध्यक्ष श्री दिलीपराव आमले यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील रिक्षा चालकांनसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत डोळे तपासणी शिबिर आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ येथे माझ्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी टू व्हीलर चालकांना मोफत हेल्मेट वाटपाचा अतिशय स्तुत्य कार्यक्रम पार पडला.
यावेळी आवर्जून या कार्यक्रमासाठी मा. राहुल गावडे साहेब ( वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक) देखील उपस्थित होते. त्याचबरोबर मा सौ सपनाताई गावडे (मा नगरसेविका), मा कासम मुलानी (अध्यक्ष महासंघ रिक्षा युनियन), मा भरतशेठ नाईक (एस बी ग्रुप), मा सौ संगीताताई दिलीप आमले (उपजिल्हासंघटीका), मा रवि ढोबळे आदी पदाधिकारी उपस्थित तथा अनेक नागरिक उपस्थित होते.
शिबीरात रिक्षा चालक व वाहन विभागातील 300 हुन अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
0 Comments