“रक्तदान – श्रेष्ठदान” शिबिराला उदंड प्रतिसाद..!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना, नवी मुंबई यांच्या वतीने व मा. अशोकराव अंकुशराव गावडे साहेब ( मा. उपमहापौर ) तथा अॅड. मा. स्वप्ना गावडे – गायकवाड (मा. नगरसेविका प्रभाग क्र. 98, नवी मुंबई ) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला.
या रक्तदान शिबिरात तब्बल १०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मा. अजित सावंत साहेब ( उपजिल्हाप्रमुख ), मा. दिपक सिंग ( उपजिल्हाप्रमुख ), मा. अविनाश जाधव, मा. राज नायर, मा. विनोद नायर,मा. शुभम भालेराव, मा.रवी ढोबळे, मा. विकास गाढवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदान मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार तसेच या शिबिराला मोलाची साथ दिली अशा नवी मुंबई ब्लड बँक यांच्या सर्व डॉक्टर्स व इतर प्रतिनिधी यांचेही मनापासून आभार.🙏🏻
+8
All reactions:

You, Navnath R Ithape, Kamlesh Bodake and 31 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *