आरोग्य तपासणी
, डोळे तपासणी तथा रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद 


शिवसेना वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व शिवसेना उपनेते विजय नाहटा साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेब, संपर्क प्रमुख किशोर पाटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, नवी मुंबई येथे लाईफ केअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, डोळे तपासणी शिबिर तसेच नवी मुंबई ब्लड बँक खारघर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन मा.श्री. अशोकशेठ गावडे (मा. उपमहापौर, नमुमनपा ) व सौ. सपनाताई गावडे मा. नगरसेविका यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला नवी मुंबतील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. लहान मुलांपासून तर वयोरुद्ध नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. विशेषतः डोळे तपासणीसाठी जेष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद देऊन आभार व्यक्त केले.
त्याप्रसंगी नितीन शिंदे (मधुतारा फाऊंडेशन), राज नायर (उपशहरप्रमुख), मनिषा गिरप (उपजिल्हासंघटक), दिपक शिंदे (विभाग प्रमुख ), रवि ढोबळे (समाजसेवक) यांच्यासह नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





+10
All reactions:
You, Ashok Gawade Fan Club, Shubham Bhalerao and 20 others
0 Comments