गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान…
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया..

अशोक गावडे फाऊंडेशन आयोजित शिक्षक सन्मान सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आमची श्री संत ज्ञानेश्वर माऊली एज्युकेशन संस्था, मा नगरसेविका सौ सपनाताई गावडे ( गायकवाड) व संजीवन हायस्कूल नेरूळ अध्यक्षा सौ मनाली गावडे ( भगत) यांच्या वतीने नेरूळ येथील संजीवन हायस्कूल व ज्ञानदीप सेवा मंडळाची प्राथमिक शाळा व हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय करावे येथे जाऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी सपनाताई गावडे व मनालीताई गावडे यांनी शिक्षकांना सन्मान पत्र व पुष्प देऊन सन्मानित केले व शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्याप्रसंगी ज्ञानदीप हायस्कूल चे संस्थापक/ अध्यक्ष म्हात्रे साहेब, मा राज नायर उपशहरप्रमुख, मा दिलीप आमले विभागप्रमुख, मा शेवाळे सर, मा विलास चौधरी सर, मा रवि ढोबळे समाजसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.





+6
0 Comments